धातुविज्ञानात धातुकापासून शुद्ध धातू मिळविण्याच्या विविध पद्धतींचा विचार करतात. धातुकामध्ये उपयुक्त खनिज आणि इतर मलखनिजे असतात. धातुक वितळविण्यापूर्वी त्यातील मलखनिजे काढून टाकावी लागतात व शुद्ध धातूचे प्रमाण शक्य तितके वाढवावे लागते. असे संकेंद्रीकरण केल्याने धातूचे उत्पादन काटकसरीचे होते.