नेतृत्व हे व्यवस्थापनाच्या अनेक तत्त्वांपैकी एक महत्त्वाचे तत्त्व आहे. कोणत्याही कार्याच्या अंमलबजावणीत नेतृत्वाची अत्यंत गरज असते. एका नियोजित ध्येयपूर्तीकडे घेऊन जाण्यासाठी आणि कार्याचे नियंत्रण व मार्गदर्शन करण्यासाठी अनेकदा योग्य नेतृत्वाची गरज भासते. नेतृत्व अनेक प्रकारचे असते.