कोणत्याही भाषेची प्रमाण बोली, ही ती बोली असते जीला प्रथम राजाश्रय आणि म्हणूनच नंतर समाजमान्यता मिळालेली असते.
सबब, प्रथम राजाश्रय आणि नंतर मिळालेली समाजमान्यता वगळता, प्रमाण आणि इतर बोलींत काहीही उच्चत्व वा गौणत्व नाही.
भाषेच्या अनेक बोली असतात. त्या ज्याप्रमाणे भौगोलिक स्थानानुसारे बदलतात तशाच त्या समाजानुसारेही बदलतात - एकाच भौगोलिक स्थानात राहणारे दोन समाज (उदा. जाती-जमाती) यांच्या बोलीतही थोडा फरक आढळतो.
फरक हा अनेक प्रकारे असू शकतो. उदाहरणार्थ -
१) उच्चार - 'न' आणि 'ण', 'ड' आणि 'र' यांची अदलाबदल, काही उच्चार लांबवणे (हेल) इत्यादी.
२) शब्दरचना - 'मला', 'मले' 'मना' ही सगळी 'मी' या शब्दाची विविध बोलींतील चतुर्थीची रुपे आहेत.
३) शब्दांचा वेगळा वापर - सदाचर्चित 'भेटला आणि 'सापडला' इत्यादी!!
४) खास शब्द - हे शब्द फक्त त्या-त्या बोलीतच आढळतात.
प्रमाणभाषा आणि बोलीभाषा यामध्ये काय फरक आहे?
✅ Updated recently