सामुद्रधुनी : दोन मोठे जलाशय जोडणाऱ्या व खाडीपेक्षा अरुंद (लहान) असलेल्या परिवाहाला सामुद्रधुनी म्हणतात. ही संज्ञा मुख्यत्वे दोन समुद्रांना जोडणाऱ्या जलाशयाच्या चिंचोळ्या भागास वापरली जाते.