मृत्युपत्र कसे तयार करावे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मृत्युपत्रावर कायदेशीररीत्या सज्ञान व सक्षम अशा कमीत कमी दोन व्यक्तींचा साक्षीदार म्हणून त्यांचे नाव, वय, व्यवसाय व पत्ता असणे आवश्यक असते. सदर दोन्ही साक्षीदारांनी, मृत्युपत्रकाराने प्रत्यक्ष मृत्युपत्र करताना व मृत्युपत्रकाराने प्रत्यक्ष सही करत असताना स्वतः पाहणे आवश्यक असते व म्हणून सह्या करणे आवश्यक असते.