मानव विकास निर्देशांकात सुधारणा होण्याच्या दृष्टीने आरोग्य, शिक्षण व उपजीविका या क्षेत्रातील उपक्रम व शाश्वत विकासाची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी दारिद्र निर्मूलन, लिंगभाव समानता, स्वच्छ व सुरक्षित पाणी, स्वच्छता, शांतता, न्याय, सर्वसमावेशक विकास, समानता, उद्योजकता, मूलभूत सुविधा, शिक्षण प्रशिक्षण इ.
2015च्या ऑगस्ट मध्ये 193 देशांनी खालील 17 ध्येयांना मान्यता दिली आहे:
*दारिद्रय निर्मुलन - सर्वत्र, सर्व स्वरूपतील दारिद्र्य / गरीबी नष्ट करणे.
*भूक निर्मुलन - भूक नष्ट करणे, अन्नाची सुरक्षितता व सुधारीत पौष्टिकता साध्य करणे आणि शाश्वत शेतीची जाहिरात करणे.
*चांगले आरोग्य - निरोगी आयुष्याची खात्री करून घेणे आणि सर्व वयोगटांमधील लोकांना स्वास्थ्य राखण्यास मदत करणे.
*दर्जेदार शिक्षण - सर्वांसाठी सर्व-समावेशित व योग्य शिक्षणाची खात्री करून घेणे आणि सर्वांना आयुष्यभर शिक्षणाच्या सुसंधी मिळवून देण्यासाठी मदत करणे.
*लैंगिक समानता - लैंगिक समानता साध्य करणे आणि सर्व महिला व मुलींना अधिकार देणे.
*शुद्ध पाणी आणि आरोग्य्दायक स्वच्छता - सर्वांसाठी पाणी आणि आरोग्यदायक स्वच्छता उपलब्ध असल्याची खात्री करून घेणे आणि त्याची व्यवस्था बघणे.
*नूतनीकरण करण्याजोगी आणि स्वस्त ऊर्जा - सर्वांना स्वस्त, विश्वसनीय, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा उपलब्ध असल्याची खात्री करून घेणे.
*चांगल्या नोकऱ्या आणि अर्थशास्त्र - सर्वांसाठी, कायम चालू ठेवलेली (सस्टेन्ड), सर्वसमावेशक व शाश्वत आर्थिक वाढ , पूर्ण आणि फलदायक कामधंदा / नोकरी आणि योग्य काम मिळवून देण्यास मदत करणे.
*नवीन उपक्रम आणि पायाभूत सुविधा - विविध शब्दरचना आवश्यक: लवचिक पायाभूत सुविधा उभारणे, सर्वसमावेशक व शाश्वत उद्योगीकरण आणि भरभराटीस सहाय्य करणाऱ्या नवीन उपक्रमांना मदत करणे.
*असमानता कमी करणे - सर्व देशांमधील व देशांची आपापसातील असमानता कमी करणे.
*शाश्वत शहरे व वसाहती - शहरे व मानवी समाजांना सर्वसमावेशक, सुरक्षित, संवेदनक्षम आणि शाश्वत बनविणे.
*उपलब्ध साधनांचा जबाबदारीपूर्वक वापर - साधनांचा शाश्वत उपभोग आणि उत्पादन नमुना याची खात्री करून घेणे.
*हवामानाचा परिणाम - हवामानातील बदल आणि त्याचे परिणाम निराकारण करण्यासाठी त्वरीत उपाययोजना करणे.
*शाश्वत महासागर - शाश्वत विकासासाठी महासागर, समुद्र, आणि सागरी साधने जतन करणे व त्यांचा सातत्याने वापर करणे.
*जमिनीचा शाश्वत उपयोग - विविध शब्दरचना आवश्यक: जमिनीवरील पर्यावरण संस्थेचे रक्षण करणे, त्याची पुनःस्थापना करणे, त्याचा शाश्वत वापर करण्यास मदत करणे, सातत्याने जंगलांची व्यवस्था बघणे, जंगले ओसाड होण्यापासून थांबवणे, जमिनीची धूप थांबवणे व धूप झालेल्या जमिनीची पुनःस्थापना करणे आणि जैवविविधतेची हानी होण्यापासून थांबवणे.
*शांतता आणि न्याय - शाश्वत विकासासाठी शांतताप्रिय आणि सर्वसमावेशक समाजांना प्रोत्साहन देणे, सर्वांना न्याय मिळवून देणे, सर्व पातळींवर कार्यक्षम, जबाबदार आणि सर्वसमावेशक संस्था स्थापन करणे.
*शाश्वत विकासासाठी भागिदारी - शाश्वत विकासाची पूर्तता करण्याच्या पद्धती सामर्थ्यवान करणे आणि जागतिक भागिदारीमध्ये नवचैतन्य निर्माण करणे.
शाश्वत विकासाचे घटक काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.