सजीव जे अन्नग्रहण करतात त्यातील मोठा हिस्सा पाण्याचाच असतो. त्यामुळे सजीवांना त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी पाण्याची गरज असते. आपल्याला आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर, आपले शरीर सशक्त ठेवावे लागते. शरीर सुदृढ ठेवणे पाण्याशिवाय शक्य नसते.