हस्त उद्योग म्हणजे काय?
✅ Updated recently
हातमाग उद्योग :हातमागाच्या साहाय्याने विणकाम करून कापड बनविण्याचा उद्योग. विणकामाच्या या पद्धतीत ताणा (उभे) व बाणा (आडवे) अशी संरचना वापरून कापड तयार करतात. ताण्याच्या समांतर लांब धाग्यांत त्यांना काटकोनात असलेले बाण्याचे धागे गुंतविले जातात. हे धागे गुंतविण्याचे काम ज्या चौकटींत घडवितात, तिला माग असे म्हणतात.