भारताच्या संसदेचे प्रतिनिधीगृह असलेल्या लोकसभेच्या ५४३ जागांसाठी एप्रिल-मे २०१४मध्ये निवडणुका लढविल्या गेल्या. सोळा मे रोजी मतमोजणी झाल्यावर निकाल प्रकाशित करण्यात आले. यात भाजप आणि मित्रपक्षांना ३३६, काँग्रेस आणि मित्रपक्षांना ६२ तर इतर पक्षांना १४९ जागांवर विजय मिळाला.