नवीन प्रश्न

वनदुर्ग म्हणजे काय? open

वनदुर्ग म्हणजे अरण्यात असलेला किल्ला, गव्हरं म्हणजेच एखाद्या गुहेचा उपयोग करून त्याचा वापर किल्ल्यासारखा होत असेल तर, कर्दमं म्हणजे चिखलात किंवा दलदलीच्या प्रदेशात बांधण्यात आलेला किल्ला, तसेच केवळ कोट किंवा गढी स्वरूपातील इमारती किल्ल्याप्रमाणेच मानल्या जातात.

पूर्ण वाचा →

हिरोजी इंदुलकर कोण होते? open

हिरोजी इंदुलकर हे स्थापत्य अभियंता होते. त्यांपी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञे वरून रायगड किल्ला बांधला. तो त्यांनी भक्कम करण्यासाठी काळा दगड व शिसे वापरले. रायगडावर वर एका शिलालेखात " सेवेसी तत्पर हिरोजी इंदुलकर" असे लिहून ठेवले आहे.

पूर्ण वाचा →

शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड का केली? open

रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली.

पूर्ण वाचा →

पहिल्या बाजीरावाने माळव्यावर स्वारी केली तेव्हा माळव्याचा सुभेदार कोण होता? open

२९ नोव्हेंबर १७२८ रोजी चिमाजी आप्पाने माळव्याचा मोगल सुभेदार गिरिधर बहादूर यास आमझेरा येथे गाठून त्याचा पराभव केला. याच सुमारास बाजीराव बुंदेलखंडात राजा छत्रसाल याच्या साहाय्यास गेला. त्याने जैतपूर येथे सुभेदार मुहम्मदखान बंगश यास वेढले आणि त्याच्या सैन्याची वाताहात केली.

पूर्ण वाचा →

मराठा मंडळ म्हणजे काय? open

सामान्यत: छत्रपती शाहूनंतर सर्व किंवा एकेकटा सरदार स्वत:स मराठा राजमंडळ असे संबोधी. अशा सर्व सरदारांचे मिळून राजमंडळ होई. शिवाजी महाराज लोकविलक्षण योद्धे आणि अजब कारभारी होते. यांमुळे त्यांनी दैनंदिन कार्याच्या विभागणीसाठी अष्टप्रधानमंडळ स्थापन केले, तरी त्यायोगे लक्षात येण्यासारखे मराठी सत्तेचे

पूर्ण वाचा →

96कुळी म्हणजे काय? open

९६ कुळे ५ प्रमुख आडनावांमध्ये विभागली गेली ती म्हणजे-यादव / जाधव,सोलंकी / सोळंके,चव्हाण,मोरे,भोसले ह्यांची नावे उर्वरित भारताच्या लढाऊ जातींशी साधर्म्य दाखविते. ह्यातील ९६ कुळी म्हणजे ९६ कुलाचे वंशज हे वरील पाच प्रकारात मोडणारे आणि खालील घराण्यांचे वंशज आहेत.

पूर्ण वाचा →