नवीन प्रश्न

स्वराज्याचे पहिला पंतप्रधान कोण होते? open

पंतप्रधान (पेशवा) :
मोरोपंत त्रिंबक पिंगळे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे.

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांचे जतन व संरक्षण का केले असावे? open

आगामी पिढ्यांना शिवाजी महाराजांचा पराक्रम केवळ पुस्तकात वाचायला मिळण्यापेक्षा अशा गड किल्ल्यांचे संरक्षण करून तो इतिहास बघायला मिळावा, यासाठी या सर्वांचे जतन अपेक्षित आहे. शासनाने गड किल्ल्यांचे जतन करावे. त्यांची देखभाल दुरूस्ती करावी.

पूर्ण वाचा →

किल्लेदार म्हणजे काय? open

किल्लेदार हा किल्ल्याचा अथवा गडाचा प्रमुख होय. सकाळी व सायंकाळी गडाचे दरवाजे किल्लेदाराच्या सांगण्यावरूनच उघडले अथवा बंद केले जात असत. किल्लेदाराकडे गडाच्या सर्व दरवाजांच्या चाव्या/ किल्ल्या असत. गड शेवटपर्यंत लढवण्याची जबाबदारी किल्लेदारावर असे, आणि गड पडला असता किल्लेदारच तो शत्रूच्या

पूर्ण वाचा →

किल्ल्याचे प्रकार किती व कोणते? open

प्राचीन पाश्चात्त्य व पौर्वात्य साहित्यात किल्ल्यांचे अनेक प्रकार वर्णिलेले आहेत. परंतु वास्तुशास्त्राच्या दृष्टीने तीनच प्रकार संभवतात, ते म्हणजे भुईकोट किल्ला, गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ला आणि द्वीपदुर्ग किंवा जंजिरा.

पूर्ण वाचा →

साल्हेर किल्ला स्वराज्यात कधी आला? open

रेणुका माता मंदिर, साल्हेर किल्ला, नाशिक. छ. शिवाजी महाराजांच्या बागलाण मोहिमेत किल्ला स्वराज्यात दाखल झाला (५ जानेवारी १६७१)

पूर्ण वाचा →

सिधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात एकूण किती गडकिल्ले आहेत? open

एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात त्यांचे 52 किल्ले होते. पुण्यात 30 डोंगरी व 2 भुईकोट असे 32 किल्ले होते. ज्या रस्त्याने शत्रू येण्याची शक्‍यता होती त्या मार्गात जास्त किल्ले बांधले गेले. स्वराज्य अजिंक्‍य रहावे म्हणून त्यांनी किल्ल्यांची रिंगणे तयार केली.

पूर्ण वाचा →

भारतात एकूण ऐतिहासिक किल्ले किती? open

असे एकूण १६० किल्ले शिवाजी महाराजांच्या नावावर आहेत. या किल्ल्यांच्या यादीत छत्रपति शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत(स्वराज्याच्या मालकीच्या) त्यावेळी असलेल्या, (शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या/शिवाजी महाराजांनी बांधलेल्या) किल्ल्यांचा समावेश आहे

पूर्ण वाचा →

शिवकाळात किल्ल्यांना विशेष महत्व काय होते? open

स्वराज्याच्या रक्षणाचे एक प्रमुख साधन म्हणून किल्ल्याचा उल्लेख प्राचीन काळापासून आढळतो. राज्याच्या सप्त अंगांत दुर्ग हे एक महत्वाचे अंग आहे. वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये किल्ल्याचे वेगवेगळे प्रकार पाडलेले आहेत परंतु त्यांचा अर्थ जवळपास एकच असतो हे लक्षात घेतले पाहिजे.

पूर्ण वाचा →