प्रश्नांची यादी

माल विक्री कायदा कधी स्थापन झाला? open

जंगम मालाच्या खरेदीविक्री व्यवहाराचे नियमन करणारा अधिनियम. १९३० साली भारतीय जंगम विक्री अधिनियम स्वतंत्रपणे अस्तित्वात आला व त्यान्वये तत्पूर्वी या व्यवहाराचे नियमन करीत असलेली संविदा अधिनियमाची ७३ ते १२३ कलमे रद्द करण्यात आली.

पूर्ण वाचा →

वैध करार काय आहे? locked

वैध करार काय आहे?
जो पर्यंत कागदपत्र किंवा करारनामा आवश्यक अधिकाराने नोंदवलेला नसेल, स्टॅंप पेपरची उपस्थिती किंवा अनुपस्थिती त्याच्या वैधतेवर परिणाम करत नाही. त्यामुळे, मुद्रांक कागदाचा विचार न करता, जर करार सुरुवातीला वैध होता, तर नोंदणीकरण कायद्यातील तरतुदींनुसार हे एक वैध करार आहे.

पूर्ण वाचा →

संचालक हे कंपनीचे कोण असतात? locked

संचालक हे कंपनीचे कोण असतात?
एखाद्या कंपनीचे किंवा संघटनेचे व्यवस्थापन करणारा किंवा तिच्यावर नियंत्रण ठेवनाऱ्या व्यक्तीला संचालक म्हणतात.


कंपनीच्या संचालकांची कामे :

कंपनी नियमावलीत नमूद केलेली संचालकाची कार्ये.
कंपनी संचालकाने कंपनीच्या उदेद्श प्राप्तीसाठी तसेच कंपनीशी निगडीत कंपनीचे सदस्य, कर्मचारी, भागधारक, समाज व पर्यावरण या सर्वांच्या हीतरक्षणासाठी

पूर्ण वाचा →

नोंदणी प्रमाणपत्र कोण देतो? locked

कंपनी नोंदणी प्रमाणपत्र किव्हा सर्टिफिकेट ऑफ इंकॉर्पोशन म्हणजे कायदेशीर कागदपत्र/परवाना म्हणजे कंपनी किंवा महामंडळाच्या स्थापनेशी संबंधित. राज्य सरकार किंवा काही अधिकारक्षेत्रांमध्ये अशासकीय संस्था/महामंडळाद्वारे जारी केलेले कॉर्पोरेशन तयार करण्याचा हा परवाना असते.

नोंदणीचा "प्रभावी दिनांक" कोणता असेल?

जेव्हा, ज्या दिनांकापासून व्यक्‍ती नोंदणीसाठी जबाबदार असते, त्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत नोंदणीसाठी अर्ज केल्यास, ज्या

पूर्ण वाचा →

वसूल भाग भांडवल म्हणजे काय? locked

वसूल भाग भांडवल म्हणजे काय?

भाग भांडवल :
आधुनिक काळात अनेक लोक एकत्र येऊन भांडवल गोळा करतात आणि उद्योग सुरू करतात. प्रत्येकाच्या हिस्स्याला भाग भांडवल असे म्हटले जाते. व्यावहारिक सोयीसाठी ठराविक किंमतिचा एक भाग असतो . प्रत्येक भागधारक आपल्याकडे असणाऱ्या आर्थिक उपलब्धतेनुसार भाग विकत घेतो.

भांडवल म्हणजे संपत्तीचा असा भाग की

पूर्ण वाचा →

विदेशी भांडवल म्हणजे काय? locked

विदेशी भांडवल म्हणजे काय?

राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेले व परराष्ट्रांकडून मिळविलेले पूरक भांडवल. जगातील राष्ट्रांच्या आर्थिक विकासाची पातळी पाहता स्थूलपणे त्यांचे दोन गट दिसून येतात : एक विकसित राष्ट्रांचा व दुसरा अविकसित आणि विकसनशील देशांचा.

दुसऱ्या गटातील राष्ट्रांना आपल्या आर्थिक विकासाची गती वाढविण्यासाठी भांडवलाची मोठ्या प्रमाणावर गरज भासते; परंतु त्यांची

पूर्ण वाचा →

२ स्थिर भांडवल म्हणजे काय ? locked

स्थिर भांडवल म्हणजे काय ?

स्थिर भांडवल म्हणजे कोणत्याही प्रकारची स्थिर मालमत्ता किंवा संपत्ती होय. खेळते भांडवल म्हणजे एकूण चालू मालमत्तेची बेरीज होय. हे भांडवल व्यवसायात जवळ जवळ कायमस्वरूपी राहते. खेळते भांडवल हे 'अभिसरण भांडवल' आहे.स्थिर भांडवलामध्ये सर्व इमारती, उत्पादनसाधने, यंत्रसामग्री, बंदरबांधणी, विद्युतपुरवठा इत्यादींचा समावेश होतो. फिरते भांडवल म्हणजे उपभोगासाठी तयार

पूर्ण वाचा →

भारतातील बँक व्यवसाय किती टक्के प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीची मर्यादा आहे? locked

रिटेल क्षेत्रात मल्टी ब्रँडमधील थेट विदेशी गुंतवणूक (Foreign Direct Investment अथवा FDI) ५१ टक्क्यांपर्यंत मान्य करणे हे एक निश्चितच सुधारणावादी पाऊल आहे.
सर्वसाधारणपणे परकीय गुंतवणूकीसाठी कोणत्याही कंपनीला दुस-या कंपनीचे १० टक्के शेअर्स खरेदी करावे लागतात. मात्र एखाद्या कंपनीने ५१ टक्के शेअर्स खरेदी केल्यास दुस-या कंपनीची ओनर कंपनी म्हणून ओळखली जाऊ शकते.

पूर्ण वाचा →

परकीय बँकांनी किती टक्के रक्कम भारतात गुंतवली पाहिजे असे बंधनकारक आहे? locked

सर्वसाधारणपणे परकीय गुंतवणूकीसाठी कोणत्याही कंपनीला दुस-या कंपनीचे १० टक्के शेअर्स खरेदी करावे लागतात. मात्र एखाद्या कंपनीने ५१ टक्के शेअर्स खरेदी केल्यास दुस-या कंपनीची ओनर कंपनी म्हणून ओळखली जाऊ शकते. भारतात रिटेलक्षेत्राचा व्याप फार मोठा आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत रिटेल क्षेत्राचा वाटा हा अंदाजे १५ टक्के आहे.


थेट परकीय गुंतवणुक (एफडीआय) म्हणजे काय

पूर्ण वाचा →

सभा म्हणजे काय सभांचे प्रकार स्पष्ट करा? locked

सभा म्हणजे काय सभांचे प्रकार स्पष्ट करा?

निश्चित विषयावर विचारविनिमय करून संस्थेच्या हिताच्या दृष्टीने एकमताने किंवा बहुमताने निर्णय घेण्यासाठी एकत्र आलेला व नियमानुसार वागणारा सभासदांचा शिस्तबद्ध समूह.
सर्वसाधारण सभांचे तीन प्रकार आहेत. त्यानुसार
1. घटनात्मक सभा,
2. वार्षिक सर्वसाधारण सभा आणि
3. विशेष सर्वसाधारण सभा.


सभा कामकाजाचे संकेत

सभा एक शास्त्र

पूर्ण वाचा →