प्रश्नांची यादी

लोकसभेत केंद्र शासनाचे वार्षिक अंदाजपत्रक कोण मांडते? open

बजेट मध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मिनिस्ट्री आपापल्या विभागाला ला लागणाऱ्या खर्चाचा आकडा देऊन त्याप्रमाणे मागणी संसदेपुढे मांडते.

पूर्ण वाचा →

जमीन खालसा म्हणजे काय? open

ज्‍या शेतजमिनीचा मालक शेतकरी स्‍वत: असतो अशा जमिनीस भोगवटादार-१ ची जमीन म्‍हणतात. अशा जमिनीची विक्री करण्‍यासाठी त्‍या शेतकर्‍यावर कोणतेही बंधन नसते किंवा कोणाच्‍याही परवानगीची आवश्‍यकता नसते. अशा शेतजमिनीला बिनदुमाला किंवा खालसा जमीनही म्‍हणतात

पूर्ण वाचा →

पट्टेदार म्हणजे काय? open

शासकीय पट्‍टेदारची व्‍याख्‍या 'महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६, कलम २(११) मध्‍ये नमूद आहे. ज्‍या शेतकर्‍यांना ठराविक मुदतीसाठी शासनाकडून वहिवाटण्‍यासाठी भाडेतत्‍वावर जमीन देण्‍यात आली आहे अशा शेतकर्‍यास शासकीय पट्‍टेदार म्‍हणतात.

पूर्ण वाचा →

वर्ग 2 ची जमीन म्हणजे काय? open

जमीनधारकांना संपूर्ण मालकी मिळालेली नाही. भोगवटादार क्रमांक दोन च्या जमिनी जर भोगवटादार क्रमांक एक मध्ये रुपांतरीत केल्यास त्या जमिनीचे संपूर्ण अधिकार शेतकऱ्याला प्राप्त होतो.

पूर्ण वाचा →

वर्ग 1 ची जमीन म्हणजे काय? open

जर सातबाऱ्यावर भोगवटादार वर्ग- 1 पद्धत असेल, तर भोगवटादार वर्ग- 1या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात, ज्यांचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात, शेतकरीच या जमिनीचा मालक असतो. म्हणजे ही जमीन विक्री करणाऱ्याच्या स्वत:च्या मालकीची असून ती खरेदी करताना विशेष अडचण येत नाही, असा याचा अर्थ होतो.

पूर्ण वाचा →

जावळीचे चंद्रराव दौलतराव यांचा मृत्यू कधी झाला? open

इ. स. १६५४ नंतर आदिलशहाने अफजलखानला जावळीवर चालून जाण्याचा हुकूम दिला. त्यामूळे चंद्रराव व शिवाजीराजे भोसले यांच्यानध्ये संघर्ष सुरू झाला आणि त्याचा परिणाम म्हणून शिवाजीराजे भोसले जावळीवर चालून गेले त्यानंतर चंद्रराव मोरे यांचा घातपाताने वध करण्यात आला.

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराजांच्या सैन्याचे नेतृत्व कोण करत होते? open

छत्रपति शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणुन नेमणुक केली. छत्रपतीशिवाजी महाराज यांचे राज्यभिषेका नंतरचे प्रमुख सेनापती. शिवाजीराजांचा राज्याभिषेक झाला असता, हंबीरराव मोहित्यांना हिंदवी स्वराज्याचा सेनापती घोषित करण्यात आले.

पूर्ण वाचा →

वतन म्हणजे काय इयत्ता सातवी? open

गावाकरिता किंवा देशासाठी करीत असलेल्या कर्तव्यबद्दल त्या व्यक्तीच्या उपजीविकेकरिता, मानमरातब राखण्यासाठी आणि जनतेचे दिलेले व वंशपरंपरेने चालणारे उत्पन्न म्हणजे वतन. यात चाकरी, वृत्ती, अधिकार, हक्क, नेमणूक यांचा अंतर्भाव होतो व हे हक्क आणि तदानुषंगिक कर्तव्ये उपभोगण्याची राजमान्य आणि लोकमान्य पद्धत म्हणजे वतनसंस्था होय.

पूर्ण वाचा →