भारतातील ब्रिटिश सत्तेचा शेवट करणे आणि राष्ट्रीय शिक्षण संस्थांची स्थापना करणे ही दोन उद्दिष्टे समोर ठेवण्यात आली. गांधीजीनी असहकाराच्या चळवळीला विधायक कार्यक्रमाची जोड दिली. त्यामुळे राष्ट्रीय चळवळ ग्रामीण भागात पोचली व तिला जनाधार प्राप्त झाला. असहकार आंदोलनास भारतीय जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.