ज्या वस्तू देशात मुळीच उत्पादन करता येत नाहीत वा उत्पादन करणे महाग पडते, अशा वस्तू आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे बाहेरून उपलब्ध होतात. देशादेशांत एखाद्या वस्तूच्या किंमतीत जो खूपच फरक पडतो, तो आंतरराष्ट्रीय देवघेवींमुळे कितीतरी कमी होतो आणि किंमती समान पातळी गाठण्यास प्रवृत्त होतात.