मंत्री मंडळाला इंग्लिश मध्ये कॅबिनेट म्हणतात. ह्या मंत्रीमंडळात जो सहभागी असतो तो मंत्री होय. मंत्री मंडळातील मंत्री हा त्याला मिळालेल्या विभागाचा प्रमुख असतो आणि ह्या खात्यांशी संबंधित निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार त्याच्याकडे असतो. त्याच्या हाताखाली राज्यमंत्री, उपमंत्री असू शकतात.