खाजगी कंपनीत किमान दोन व जास्तीत जास्त पन्नास सभासद असतात. आपल्या नावाच्या शेवटी ' खाजगी मर्यादित ' असे शब्द लावावे लागतात. अशा कंपनीचे भाग हस्तांतरणीय नसतात. तसेच कंपनीला माहितीपत्रक प्रसिद्घ करून भाग खरेदी करण्यासाठी जनतेला आवाहन करता येत नाही.