एकनाथ संभाजी शिंदे (९ फेब्रुवारी १९६४) हे एक भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्र राज्याचे २० वे मुख्यमंत्री आहेत.
२०१५ ते २०१९ पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. २००४,२००९, २०१४ आणि २०१९ असे सलग चार वेळा ते महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ते १९८० च्या दशकात शिवसेनेत दाखल झाले होते.
सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.