कॅटेगरी: बैंकिंग

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हुंडी बाजार योजना कधी लागू केली? locked

हुंडी बाजार, भारतातील : हुंडी बाजार म्हणजे हुंड्यांचा बाजार अथवा हुंड्यांची जेथे जेथे देवघेव केली जाते, अशी सर्वठिकाणे. भारतात हुंडी-व्यवहाराचे नियमन चलनक्षम दस्तऐवजाचा कायदा १९८१ नुसार केले जाते. 

 

हुंडी-व्यवहार हा व्यापाऱ्यांस त्यांच्या उधार विक्रीच्या वसुलीसाठी फार उपयोगी पडतो. म्हणून खेळते भांडवल उभारणीमध्ये हुंडी-व्यवहाराचे फार महत्त्व आहे. या व्यवहारात खालील मुद्दे महत्त्वाचे

पूर्ण वाचा →

स्टेट बँक ऑफ इंडिया ची स्थापना कधी झाली? locked

भारतीय स्टेट बँक ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. सन १९२१ मध्ये स्थापन झालेल्या इंपीरियल बँक ऑफ इंडियाचे नाव बदलून `स्टेट बँक ऑफ इंडिया' झाले. भाग भांडवल आणि गंगाजळी याचा विचार करता जगातील सर्वात मोठ्या १०० बँकांत या बँकेचा २०१२ साली ६०वा क्रमांक लागतो. शाखा आणि कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेतल्यास

पूर्ण वाचा →

प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या स्थापनेत पुढाकार घेणाऱ्या बँकेला काय म्हणतात? open

प्रत्येक बँक कोणत्या तरी सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने प्रायोजित करणे अपेक्षित असले तरी प्रत्येक RRB स्वतंत्र आणि आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावी याचा आग्रह होता. गांधी जयंतीच्या मुहूर्तावर २ ऑक्टोबर १९७५ रोजी 'प्रथमा बँक' या नावाने ५ कोटी भाग भांडवल असलेली पहिली RRB सुरु करण्यात आली.

पूर्ण वाचा →

बँकिंग नियमन अधिनियम 1949 च्या मुख्य तरतुदी काय आहेत? open

बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 5 (1)( बी) नुसार – बँक म्हणजे मागणी करताक्षणी परत करण्याच्या अटीवर स्वीकारलेल्या ठेवीतून ग्राहकांना धनादेश, ड्राफ्ट, ऑर्डर व अन्य मार्गांनी पैसे काढण्याची परवानगी देणे व ठेवींचा पैसा कर्जाने देण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी वापरणे होय.

पूर्ण वाचा →

भारतामध्ये जिल्हा सहकारी बँकेच्या कार्याचे नियमन कोण करते? open

राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर त्वरित, म्हणजे २६ जून रोजी वटहुकूम काढण्यात येऊन, नागरी सहकारी बँकेचे बहुतांश नियंत्रण रिझर्व्ह बँकेकडे देण्यात आले आहे.

पूर्ण वाचा →

व्यापारी बँका काय करतात? open

व्यापारी बँका लोकांकडून ठेवी स्विकारून त्याच ठेवीतुन गरजू लोकांना कर्ज देण्याचे प्राथमिक कार्य करतात. बँक ही ऋणको व धनको अशी दुहेरी भूमिका बजावते. 1. प्राथमिक कार्य - ठेवी स्विकारणे व कर्ज देणे यांना बँकांची प्राथमिक कार्य मानली जातात व तसेच त्यांना बँकेची आम्ल चाचणी कार्य मानली जातात.

पूर्ण वाचा →

बँकांचे राष्ट्रीयीकरण म्हणजे काय? open

एखाद्या बँकेची अथवा काही बँकांची मालकी जेव्हा सरकार स्वतःकडे घेते व त्या बँकेचे किंवा बँकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सरकारकडे येते त्यास राष्ट्रीयीकरण म्हणतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण १ जानेवारी १९४९ रोजी करण्यात आले.

पूर्ण वाचा →