प्रश्नांची यादी

वित्तीय मत्ता म्हणजे काय? open

वित्तीय मध्यस्थ बहुसंख्य ऋणकोंना कर्जवितरण करून जोखिमी गुंतवणुकीचे सापेक्षतेने जोखीममुक्त गुंतवणुकीत रूपांतरण करतात. लहान ठेवींचे मोठ्या कर्जाशी आणि मोठ्या ठेवींचे लहान कर्जांशी जुळवणी करतात. जेणेकरून एखाद्या गुंतवणुकीपासून नुकसान झाल्यास त्याची भरपाई दुसऱ्या गुंतवणुकीपासून मिळणाऱ्या नफ्याने होऊ शकते.

पूर्ण वाचा →

व्यापारी बँका काय करतात? open

व्यापारी बँका लोकांकडून ठेवी स्विकारून त्याच ठेवीतुन गरजू लोकांना कर्ज देण्याचे प्राथमिक कार्य करतात. बँक ही ऋणको व धनको अशी दुहेरी भूमिका बजावते. 1. प्राथमिक कार्य - ठेवी स्विकारणे व कर्ज देणे यांना बँकांची प्राथमिक कार्य मानली जातात व तसेच त्यांना बँकेची आम्ल चाचणी कार्य मानली जातात.

पूर्ण वाचा →

बँकांचे राष्ट्रीयीकरण म्हणजे काय? open

एखाद्या बँकेची अथवा काही बँकांची मालकी जेव्हा सरकार स्वतःकडे घेते व त्या बँकेचे किंवा बँकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सरकारकडे येते त्यास राष्ट्रीयीकरण म्हणतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण १ जानेवारी १९४९ रोजी करण्यात आले.

पूर्ण वाचा →

बँकांची बँक म्हणून कोण काम करते? open

RBI हे आहे. 1935 मध्ये भारतीय रिझर्व बँक ही बँकांची बँक म्हणून स्थापन करण्यात आली कारण ती वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली मध्यवर्ती बँक आहे. ही भारतातील बँकिंग प्रणालीचे नियमन आणि राष्ट्रीय चलन जारी करणे आणि पुरवठा यासाठी जबाबदार आहे. भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 नुसार RBI ची स्थापना केली गेली

पूर्ण वाचा →

बँकिंग म्हणजे काय? open

ठेवी स्वीकारणे, त्या ठेवीत रक्षण करणे, मागता क्षणी ठेवी परत करणे, कर्जे देणे आणि बचत आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे इत्यादी कार्य ज्या ठिकाणी केल्या जातात त्याला बँक असे म्हणतात. बॅंक प्रणाली ही प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महत्त्वाची यंत्रणा आहे.

पूर्ण वाचा →

शिवरायांची राजमुद्रा संस्कृत भाषेत का होती? open

शहाजी राजे, जिजामाता यांच्या मुद्रेवर यावनी भाषेचा प्रभाव होता. मात्र शिवाजी महाराजांची मुद्रा ही संस्कृत भाषेतील आहे.

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा अर्थ काय आहे? open

प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृद्धिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे.

पूर्ण वाचा →

समाजशास्त्र चे जनक कोण आहेत? open

फ्रेंच तत्ववेत्ता ऑगस्ट कॉम्टे यांना समाजशास्त्राचे जनक म्हटले जाते. त्यांनी 1838 मध्ये समाजशास्त्र हा शब्द समाजाच्या वैज्ञानिक अभ्यासासाठी वापरला.

पूर्ण वाचा →