प्रश्नांची यादी

स्थावर व जंगम मालमत्ता म्हणजे काय? open

पृथ्वीशी संलग्न असलेल्या वनस्पती किंवा झाडांना स्थावर मालमत्ता म्हणून संबोधले जाते. प्रत्यक्षात, ते कायदेशीर कायदे आणि कर आकारणीसाठी जबाबदार राहतात. याउलट, जंगम मालमत्ता म्हणजे काही मौल्यवान वस्तू ज्या हलवल्या जाऊ शकतात, जसे की दागिने, संगणक, घड्याळे, पैसे इ.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रातील वतनदार कोण होते? open

वतनदारी बऱ्याच समाजात होती. जसे कि ब्राह्मण , कायस्थ, धनगर, मुस्लिम, कोळी, भंडारी, माळी, रामोशी, गुरव आणि हरिजन या सगळ्या समाजाकडे होती.

पूर्ण वाचा →

उपविभागीय अधिकारी म्हणजे कोण? open

उप विभागीय अधिकारी (एसडीओ / एसडीएम) विभागाचा प्रमुख असून उपविभागीय अधिकारी हा सहाय्यक जिल्हाधिकारी, आयएएस किंवा उपजिल्हाधिकारी कॅडर मधील आहेत . ते त्यांच्या विभागात कार्यरत असलेले उप विभागीय न्यायदंडाधिकारी आहेत. उपविभागीय कार्यालये जिल्हाधिकारी यांची प्रतिकृती असून ते प्रशासकीय व्यवस्थेत मध्यस्थ म्हणून कार्य करतात.

पूर्ण वाचा →

तलाठी कार्यालय ला काय म्हणतात? open

कार्यक्षेत्र तलाठ्याच्या कार्यक्षेत्रास सज्जा किंवा साझा असे म्हणतात. सर्वसाधारणपणे १ ते ३ गावाच्या समूहास एक तलाठी असतो. सज्यातील सर्व गावांची गाव दप्तरे अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी तलाठयावर असते.

पूर्ण वाचा →

एका महसूल विभागात किती तालुके असतात? open

प्रत्येक प्रशासकीय विभागासाठी महाराष्ट्र्र शासनातर्फे विभागीय आयुक्त नेमला आहे. सध्या महाराष्ट्र्रामध्ये ३५ जिल्हे असून त्यामध्ये ९२ उपविभाग आणि ३५३ तालुक्यांचा समावेश होतो.

पूर्ण वाचा →

तालुकास्तरावर महसूल गोळा करण्याचे कार्य कोण करते? open

तलाठी कामे व कर्तव्य महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाच्या कणा असेलेल्या महसूल विभागाचे तलाठी Village Accountant हे ग्रामस्तरावरील महत्वाचे अधिकारी आहेत. महसूल प्रशासनातील सर्व योजना व कार्यक्रम यशस्वी करणारा शेवटचा घटक म्हणजे 'तलाठी' होय

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रात कमाल जमीन धारणा किती एकर होती? open

महाराष्ट्रात कमाल शेत जमीन धारणा कायदा १९६१ साली आला, प्रत्येक राज्याची कमाल शेत जमीन धारणा मर्यादा वेगवेगळी आहे. महाराष्ट्रात कमाल जमीन धारणा कायद्यान्वये कोरडवाहू शेतजमिनीसाठी ५४ एकर जमीन आणि जमीन बागायत असेल तर १८ एकर अशी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

पूर्ण वाचा →

जिल्हास्तरावर महसूल प्रशासनाचा प्रमुख अधिकारी म्हणून कोण काम पाहतो? open

जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी हे जिल्हा प्रशासनामध्ये मध्यवर्ती ठिकाण आहेत. ते जिल्ह्यातील महसूल प्रशासनाचे प्रमुख आहेत आणि जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

पूर्ण वाचा →

उत्तराधिकार प्रमाणपत्र म्हणजे काय? open

उत्तराधिकार प्रमाणपत्र एक दस्तऐवज असते जे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना मालमत्तेवर हक्क देतो. जर तुमचे वडील किंवा आजोबा यांचे निधन झाले आहे आणि त्यांनी इच्छापत्र तयार केले नसेल तर तुम्हाला त्यांची मालमत्ता सहजासहजी मिळणार नाही

पूर्ण वाचा →

वाटणी पत्र म्हणजे काय? open

पार्टिशन). हिंदू अविभक्त कुटुंबातील सहदायाद (कोपार्सेनर), संयुक्त हिस्सेदार किंवा समाईक हिस्सेदार यांच्या एकत्रित समाईक मालमत्तेचे प्रत्येकाच्या हिश्श्याप्रमाणे विभाजन करून देणे म्हणजे 'वाटणी' व ज्या दस्तऐवजायोगे अशी वाटणी केली जाते त्यास 'वाटणीपत्र' असे म्हणतात.

पूर्ण वाचा →