प्रश्नांची यादी

पुढील पैकी कोण राज्याच्या राज्यपाल आला पदावरून हटवू शकतात? locked

राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात.

भारतातील कार्यकाल:
सर्वसाधारणपणे राज्यपालाचा कार्यकाल ५ वर्षाचा असतो. मुदतीपूर्वी तो राजीनामा देऊ शकतो. पाच वर्षांची मुदत संपल्यावर त्याची त्याच पदावर पुन्हा नियुक्ती राष्ट्रपती करू शकतो. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो त्या पदावर राहु शकतो.[१]

मृत्यूने ते पद रिक्त होऊ शकते

पूर्ण वाचा →

भारत हे नाव कसे पडले? locked

देशाचे नाव भरत घराण्याच्या नावावरुन पडले. राजा दुष्यंत आणि राणी शकुंतला यांचा मुलगा असलेला महान राजा भरत हा या घराण्याचा पुढारी होता असे म्हणतात. राजा भरत हा भारताचा पहिला राजा मानला जातो. म्हणूनच अनेक इतिहासकारांचा असा विश्वास आहे की या शक्तिशाली राजाच्या नावावरुन भारत देशाचे नाव देण्यात आले.

भारत किंवा भारतीय

पूर्ण वाचा →

भारताचे राष्ट्रपती होण्यापूर्वी कोण भारताचे संरक्षण आणि अर्थमंत्री होते? locked

भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून पद भूषविलेले प्रणव मुखर्जी हे प्रशासकीय कामकाजात अद्वितीय अनुभव असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी केंद्रीय परराष्ट्र, संरक्षण, वाणिज्य आणि अर्थमंत्री म्हणून काम काम पाहिले होते

पूर्ण वाचा →

राष्ट्रपती होण्यासाठी कोण कोणत्या अटी असतात? locked

भारतीय राज्यघटनेच्या कलम ५८ मध्ये राष्ट्रपती पदासाठी पात्र होण्यासाठी आवश्यक असलेली प्रमुख पात्रता निश्चित केली आहे. राष्ट्रपती हा,

1 भारताचा नागरिक
2 ३५ वर्षे किंवा त्याहून अधिक वय
3 लोकसभेचे सदस्य होण्यासाठी पात्र असणे आवश्यक आहे.

जर एखादी व्यक्ती भारत सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकारच्या अंतर्गत

पूर्ण वाचा →

नवीन आर्थिक धोरणाचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? locked

नवीन आर्थिक धोरणाची मुख्य वैशिष्ट्ये अशी:
• डी परवाना: केवळ चार उद्योगांना सक्तीचा परवाना आवश्यक आहे. (इलेक्ट्रॉनिक एरोस्पेस, संरक्षण उपकरणे, औद्योगिक स्फोटके, घातक रसायन आणि औषधे, सिगारेट)
• एमआरटीपी अधिनियम रद्द करणे.
• छोट्या क्षेत्रांना प्रोत्साहन.
• परदेशी गुंतवणूकीला प्रोत्साहन
• सार्वजनिक क्षेत्राची भूमिका कमी केली गेली.
• विविध क्षेत्रातील सुधारणांची अंमलबजावणी.

पूर्ण वाचा →

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होते? locked

इंदिरा प्रियदर्शिनी गांधी (पूर्वाश्रमीच्या नेहरू ; १९ नोव्हेंबर १९१७ - ३१ऑक्टोबर १९८४) या एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख नेत्या होत्या. १९६६ मध्ये त्या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून निवडल्या गेल्या. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान आहेत.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या

पूर्ण वाचा →