नवीन प्रश्न

समाजशास्त्राची व्याप्ती म्हणजे काय? open

समाजशास्त्र म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो.

पूर्ण वाचा →

मानवी संबंध म्हणजे काय त्याचे महत्त्व स्पष्ट करा? open

मानवामध्ये जन्मजात इतर मानव जातीसाठी दयेच्या, सहानभूतीच्या व कोमल भावभावना असतात. परिचर्येची तात्विक बैठक ही व्यक्ती, कुटुंब आणि समाज या सभोवती फिरत असते. ज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मानवी संबंध व परस्पर संबंध हे मूलभूत घटक ठरतात. सतत वास्तव आणि वातावरणाशी होणारी

पूर्ण वाचा →

कलकत्ता विद्यापीठात समाजशास्त्राचा अध्ययनाला कधी सुरुवात झाली? open

1909 पासून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रात विशेष पेपर म्हणून. 1975 मध्येच विद्यापीठ अनुदान आयोगाने कलकत्ता विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाला बेलादत्तगुप्ता, तत्कालीन राज्यशास्त्र विभागाचे वाचक, समाजशास्त्राचे प्रमुख म्हणून मान्यता दिली.

पूर्ण वाचा →

समाज व्यवस्था विकसित झाल्यामुळे मानवी जीवनात कोण कोणते बदल झाले? open

माणसाच्या जीवनात जे बदल झाले आहेत ते मुळात समाजातील विकासामुळे जसे की व्यापारीकरण, वाढती कामगार विभागणी, उत्पादन विस्तार, राष्ट्र-राज्य निर्मिती, तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रगती, सामाजिक गतिशीलता आणि वाढ इ.

पूर्ण वाचा →

नागरी समाजशास्त्राचे स्वरूप कसे आहे? open

नागरी समाजाची संपूर्ण ओळख सर्वसाधारणपणे परिस्थितिवैज्ञानिक, लोकसंख्यात्मक, संस्थात्मक, सामाजिक मूल्यात्मक, स्तरीकरणात्मक, संरचनाभेदात्मक व सामाजिक रोगचिकित्सात्मक या सात दृष्टिकोनांतून होते. या दृष्टिकोनांतून एकाच समाजाच्या विविध अंगांचे ज्ञान होते. ही विविध अंगे अर्थातच परस्परांवर अवलंबून आहेत.

पूर्ण वाचा →

स्वयंसेवी संस्था काय करते? open

सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, बौद्धिक इ. क्षेत्रांत लोककल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था. या संस्थांची संघटना एका विशिष्ट हेतूने व उद्दिष्टासाठी केलेली असते आणि त्यांत काम करणारे स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात.

पूर्ण वाचा →

सागर शास्त्राचे जनक कोण? open

समुद्रातील प्रत्येक गोष्टीची माहिती असणारा आणि समुद्र प्रवास सुखकारक करणारा व्यक्ती म्हणूनच सागर शास्त्राचा जनक अशी त्यांची ओळख निर्माण झाली. मॅथ्यू फानटेन मोरी सागर शास्त्राचे पहिले संशोधक व नवोदल अधिकारी सुद्धा होते. समुद्रातील मार्ग शोधणारी व्यक्ती अशा नावाने सुद्धा त्यांना

पूर्ण वाचा →

वैधानिक न्याय म्हणजे काय? open

वैधानिक न्याय
जॉन ऑस्टिन यांनी कायदा हे न्यायाचे व दुष्कृत्य दडपून टाकण्याचे साधन आहे, असा विचार मांडला. न्यायाच्या तत्त्वाखेरीज कायदा केवळ दडपणुकीचे साधन बनतो,म्हणून कायदा ही संकल्पना न्यायावर अवलंबून आहे.

पूर्ण वाचा →

एनजीओ म्हणजे काय एखाद्या एनजीओ चे नाव सांगा? open

एनजीओ म्हणजे एक अशी गैरसरकारी संस्था (Non-Government Organisation) असते ज्यात सरकारचा कोणत्याही प्रकारचा हात नसतो, संस्थेला स्वयंसेवी संस्था असेही म्हटले जाते.

पूर्ण वाचा →