प्रश्नांची यादी

शिवकाळात किल्ल्यांना विशेष महत्व काय होते? open

स्वराज्याच्या रक्षणाचे एक प्रमुख साधन म्हणून किल्ल्याचा उल्लेख प्राचीन काळापासून आढळतो. राज्याच्या सप्त अंगांत दुर्ग हे एक महत्वाचे अंग आहे. वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये किल्ल्याचे वेगवेगळे प्रकार पाडलेले आहेत परंतु त्यांचा अर्थ जवळपास एकच असतो हे लक्षात घेतले पाहिजे.

पूर्ण वाचा →

शिवकालीन किल्ल्याचे प्रकार किती होते? open

किल्ल्यांच्या स्थानावरून आणि बांधणीच्या पद्धतीवरून अमिलापितार्थचिंतामणी ह्या ग्रंथाचा कर्ता सोमेश्वर ह्याने किल्ल्यांचे नऊ प्रकार पाडलेले आहेत; ते म्हणजे जलदुर्ग, गिरिदुर्ग, अश्मदुर्ग, इष्टिकादुर्ग, मृत्तिकादुर्ग, वनदुर्ग, मरूदुर्ग, दारूदुर्ग व नरदुर्ग होत.

पूर्ण वाचा →

राजगड किल्ला कसे जायचे? open

राजगड किल्ल्यावर कसे जायचे
तसेच पुणे-सातारा महामार्गाने थेट मार्ग आहे. राजगडावर जाण्याचा मार्ग नसरापूर फाटा मार्गे आहे जो कात्रज बोगद्यापासून अंदाजे १५ ते २० किमी आहे आणि NH ४ वरील पहिल्या टोलनंतर मॅकडोनाल्ड्स/डोमिनोस आउटलेटपासून फक्त ५ किमी आहे. NH ४ ने नसरापूरला पोहोचा, हे पुणे स्टेशनपासून अंदाजे ३५ किमी आहे.

पूर्ण वाचा →

वनदुर्ग म्हणजे काय? open

वनदुर्ग म्हणजे अरण्यात असलेला किल्ला, गव्हरं म्हणजेच एखाद्या गुहेचा उपयोग करून त्याचा वापर किल्ल्यासारखा होत असेल तर, कर्दमं म्हणजे चिखलात किंवा दलदलीच्या प्रदेशात बांधण्यात आलेला किल्ला, तसेच केवळ कोट किंवा गढी स्वरूपातील इमारती किल्ल्याप्रमाणेच मानल्या जातात.

पूर्ण वाचा →

हिरोजी इंदुलकर कोण होते? open

हिरोजी इंदुलकर हे स्थापत्य अभियंता होते. त्यांपी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञे वरून रायगड किल्ला बांधला. तो त्यांनी भक्कम करण्यासाठी काळा दगड व शिसे वापरले. रायगडावर वर एका शिलालेखात " सेवेसी तत्पर हिरोजी इंदुलकर" असे लिहून ठेवले आहे.

पूर्ण वाचा →

शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड का केली? open

रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली.

पूर्ण वाचा →

पहिल्या बाजीरावाने माळव्यावर स्वारी केली तेव्हा माळव्याचा सुभेदार कोण होता? open

२९ नोव्हेंबर १७२८ रोजी चिमाजी आप्पाने माळव्याचा मोगल सुभेदार गिरिधर बहादूर यास आमझेरा येथे गाठून त्याचा पराभव केला. याच सुमारास बाजीराव बुंदेलखंडात राजा छत्रसाल याच्या साहाय्यास गेला. त्याने जैतपूर येथे सुभेदार मुहम्मदखान बंगश यास वेढले आणि त्याच्या सैन्याची वाताहात केली.

पूर्ण वाचा →