प्रश्नांची यादी

शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती आणि त्या भाषेत का? locked

शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती आणि त्या भाषेत का?
शिवाजी महाराजांची राजमुद्रा संस्कृत भाषेत होती.

छत्रपती राजेंनी पुण्याच्या कारभार आपल्या हाती घेतल्यावर स्वतःची एक स्वतंत्र राजमुद्रा तयार करण्यास सांगितली. राजमुद्रेवर संस्कृत भाषेत लिहिले होते.

राजमुद्रेवर संस्कृत भाषेत लिहिले होते.

"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता

शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते"

अर्थ : ज्या प्रमाणे प्रतिपदेचा चंद्र

पूर्ण वाचा →

शिवकालीन राजगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय? locked

शिवकालीन राजगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय?

राजगडाचे पूर्वीचे नाव होते मुरंबदेव. हा किल्ला बहामनी राजवटीमध्ये याच नावाने ओळखला जात असे. अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असे नव्हते.

राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती.

राजगड किल्ला हे पुणे शहरापासून दक्षिण-पश्चिमेस स्थित आहे. गुंजावणे हे

पूर्ण वाचा →

सगुणाबाई यांच्या पोटी जन्मलेल्या छत्रपती शिवरायांच्या कन्येचे नाव काय? locked

शिवरायांची मुले आणि मुली -

* शिवरायांना सईबाईंपासून संभाजी महाराज पुत्ररत्नाची उत्पत्ती झाली. संभाजी महाराज ह्यांच्या पत्नी पिलाजीराव शिर्के ह्यांच्या कन्या जिऊबाई उर्फ येसूबाई होत्या. 

* सोयराबाईंच्या पोटी राजाराम ह्यांच्या जन्म झाला. ह्यांच्या देखील तीन पत्नी होत्या. प्रतापराव गुजर ह्यांची कन्या जानकीबाई, हंबीरराव मोहिते ह्यांची कन्या ताराराणी आणि कागलकर घाटगे ह्यांची

पूर्ण वाचा →

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जेष्ठ कन्येचे नाव काय होते? locked

छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण आठ मुले होती त्यांची माहिती पुढीलप्रमाणे

१) सखुबाई/सकवारबाई - यांचा जन्म १६५० मध्ये राणी सईबाईंंच्या पोटी झाला, यांचाविवाह त्यांचे मामेभाऊ महादजी बजाजी नाईक निंबाळकर यांच्याशी लावून दिला होता. शंभुराज्यांच्या हत्येनंतर महादजींना ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर डांबून ठेवले होते जेथे त्यांचा मृत्यू झाला आणि म्हणून सखुबाई निपुत्रिक सती गेल्या होत्या.

२)

पूर्ण वाचा →

शिवरायाचे निधन कधी झाले? locked

शिवरायाचे निधन कधी झाले?
छत्रपती शिवरायांचे निधन स्वराज्याची राजधानी रायगड येथे रौद्र संवत्सर शके १६०२ , चैत्र शुद्ध पोर्णिमा , शनिवार ३ एप्रिल १६८० रोजी झाले.


छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनक्रम थोडक्यात खाली दिलेला आहे-

शोध - सव॔प्रथम भारतीय नौदलाचा शोध.
१९ फेब्रुवारी १६३० -

पूर्ण वाचा →

हिंदवी स्वराज्याच्या हेरखात्याचा प्रमुख कोण होता? locked

हिंदवी स्वराज्याच्या हेरखात्याचा प्रमुख कोण होता?
मूळ बहुरुपी असलेले आणि नक्कल करणे व वेश बदलविण्यात पांरगतअसलेले बहिर्जी नाईक ह्यांना, त्यांचे या कलेतील कौशल्य पाहून मराठी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याच्या गुप्तहेर खात्यात सामील केले. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते.

पूर्ण वाचा →

महाराणी सोयराबाई यांना किती मुले होती? locked

महाराणी सोयराबाई यांना किती मुले होती?
सोयराबाईं राणीसाहेबां पासून शिवरायांना दोन अपत्ये झाली . कन्या दीपाबाई ऊर्फ बाळी बाई व पुत्र छत्रपती राजाराम महाराज .

पूर्ण वाचा →

राज्याभिषेक समयी किती प्रधान यांची नेमणूक करण्यात आली होती? locked

राज्याभिषेक समयी किती प्रधान यांची नेमणूक करण्यात आली होती?

राज्याभिषेक समयी 8 प्रधान यांची नेमणूक करण्यात आली होती.

शिवाजी महाराजांच्या या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री होते.

1. पंतप्रधान (पेशवा) :

मोरोपंत त्रिंबक पिंगळे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी

पूर्ण वाचा →