प्रश्नांची यादी

संशोधन करण्याचा उद्देश काय आहे? open

संशोधन म्हणजे ज्ञानाची पातळी वाढवण्यासाठी एखाद्या विषयाचा पद्धतशीरपणे केलेला अभ्यास होय. यामध्ये सत्याची तपासणी, आधी सापडलेल्या तत्त्वांची पुष्टी, नवीन विषयाचा अभ्यास आदी प्रकार असतात.

पूर्ण वाचा →

इतिहास लेखन म्हणजे का? open

इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे संशोधन करून ,भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची चिकित्सापूर्वक मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला " इतिहासलेखन " असे म्हणतात. उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे. त्या माहितीची स्थल व काळ यांच्या संदर्भात माहिती करून घेणे,तसेच त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नांची मांडणी करणे.

पूर्ण वाचा →

माळवा संस्कृतीच्या लोकांना महाराष्ट्राचे आद्य शेतकरी का म्हटले जाते? open

माळवा संस्कृतीतील लोकांनी १६०० ई.
च्या आसपास महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी शाश्वत वसाहती निर्माण केल्या. त्यांना महाराष्ट्राचे आद्य शेतकरी म्हटले जाते.

पूर्ण वाचा →

सिंधू संस्कृतीचा शोध कधी लागला? open

सिंधू संस्कृतीच्या अस्तित्वाचा पुरावा दयाराम सहानी यांनी १९२१ मध्ये उजेडात आणला. त्याच वर्षी पंजाबातील हडप्पा येथे प्रायोगिक उत्खनन झाले, त्यात सिंधू संस्कृतीचे ताम्रपाषाणयुगीन स्वरुप स्पष्ट झाले. राखालदास बॅनर्जी यांनी मोहें-जो-दडोचा शोध लावला (१९२२).

पूर्ण वाचा →

सिंधू संस्कृतीतील लोकांचा मुख्य व्यवसाय काय आहे? open

1 म्हणजे शेती. सिंधू संस्कृतीतील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती होता . मुख्य पिके: गहू, बार्ली, तांदूळ, तारखा, मोहरी आणि कापूस.

पूर्ण वाचा →

हडप्पा संस्कृतीची लिपी काय होती? open

मोहें-जो-दडो लिपि : मोहें-जो-दडो लिपी भारत आणि पाकिस्तानातील ज्ञात असलेली सर्वांत प्राचीन लिपी आहे. पाकिस्तानमध्ये मंगमरी जिल्ह्यातील हडप्पा आणि सिंध प्रांताच्या लार्कान जिल्ह्यातील मोहें-ज-दडो या गावी ही लिपी असलेल्या अनेक मुद्रा सापडल्या आहेत.

पूर्ण वाचा →