प्रश्नांची यादी

जोंधळे म्हणजे काय? open

जोंधळ्यासारखे बारीक सोन्याचे मणी असलेली व ४। ५ पदरांची, मधोमध जाळीचा मणी किंवा बेलपान असलेली पोत. जोंधळे उचलणें-शपथ घेणें. (शपथेचा एक प्रकार).

पूर्ण वाचा →

सेवाभावी संस्था म्हणजे काय? open

सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, बौद्धिक इ. क्षेत्रांत लोककल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था. या संस्थांची संघटना एका विशिष्ट हेतूने व उद्दिष्टासाठी केलेली असते आणि त्यांत काम करणारे स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात.

पूर्ण वाचा →

मराठ्यांचा दिल्ली दरबारातील वकील कोण होता? open

या समारंभाचे वृत्त निजामाच्या दरबारातील मराठी राज्याचा वकील गोविंदराव काळे यांस समजले. त्यावेळी ता. २ जुलै १७९२ रोजी त्याने नाना फडणीसला पत्र पाठवले, ते येथे समग्र देत आहे.

पूर्ण वाचा →

तिसरे इंग्रज मराठा युद्ध कधी झाले? open

तिसरे इंग्रज-मराठा युद्ध हे इ. स. १८१७-१८मध्ये मराठे व इंग्रजांच्यात झालेले तिसरे व निर्णायक युद्ध होते. या युद्धात इंग्रजांनी मराठा साम्राज्याचा पराभव केला व जवळपास संपूर्ण भारतावर नियंत्रण मिळवले.

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी का ठेवले? open

शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आले. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले.

पूर्ण वाचा →