नवीन प्रश्न
सर्वसाधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागी पाहता येण्यासारख्या सौर प्रारणाला सूर्यप्रकाश म्हणतात. सूर्याच्या अंतरंगात व पृष्ठभागावर घडणाऱ्या प्रक्रियांमधून सूर्यप्रकाशासह सौर प्रारण (तरंगरुपातील ऊर्जा) उत्सर्जित होत असते. क्ष-किरण, जंबुपार व अवरक्त किरण तसेच रेडिओ तरंग या रुपांतही सौर ऊर्जा उत्सर्जित होत असते.
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi पृथ्वीवरील प्राणी व वनस्पतींच्या एकूण सुमारे ८० लाख प्रजाती असाव्यात असा शास्त्रज्ञांचा अंदाज असून, त्यांपैकी सुमारे दहा लाख प्रजाती विनाशाच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा 'ग्लोबल असेसमेंट रिपोर्ट ऑन बायोडायव्हर्सिटी अँड इकोसिस्टिम सर्व्हिसेस' या अहवालाने दिला आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या अक्षास (आस), काटकोन करून असलेले आणि उत्तर व दक्षिण ध्रुवापासून समान अंतरावर असणारे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काल्पनिक महावर्तुळ म्हणजे विषुववृत्त होय. विषुववृत्त म्हणजे शून्य अंश अक्षवृत्त. विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे विभाजन होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi पृथ्वीच्या सूर्याभोवती स्थिर मार्ग किंवा कक्षेत फिरणाऱ्या हालचालीला क्रांती म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi रेखावृत्तांमधील अंतर : विषुववृत्तावर (०° अक्षवृत्तावर) कोणत्याही ठिकाणी लगतच्या/ जवळच्या दोन रेखावृत्तांमधील अंतर हे १११ कि. मी (६० सागरी मैल-नाॅटिकल मैल) असते. २३°३०' उत्तर आणि २३°३०' दक्षिण अक्षांशांवर म्हणजेच कर्कवृत्त आणि मकर वृत्तांवर कोणत्याही ठिकाणी लगतच्या दोन रेखावृत्तांमधील अंतर हे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi सूर्य क्रांतिवृत्तावर दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धामध्ये जाताना विषुववृत्ताला संपात बिंदूमध्ये जेव्हा छेदतो, त्या घटनेला वसंतसंपात म्हणतात आणि त्या संपात बिंदूला वसंतसंपात बिंदू म्हणतात. पृथ्वीचा अक्ष स्थिर नाही.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi सूर्याचे वस्तुमान पृथ्वीच्या ३३३,००० पट आहे, आणि म्हणून त्याचे गुरुत्वाकर्षण देखील पृथ्वीपेक्षा जास्त आहे. आपल्या सूर्यमालेत विविध वस्तुमानाचे ग्रह आणि त्यांचे उपग्रह आहेत, साहजिकच त्यामुळे त्यांचे गुरुत्वाकर्षण वेगळेवेगळे असते.
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi पृथ्वीचा आस दक्षिणोत्तर असून उत्तरेकडे तो साधारणपणे ध्रुव ताऱ्याकडे रोखलेला आहे. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. ध्रुवताऱ्यावरून बघितल्यास पृथ्वी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते असे दिसेल. पृथ्वी स्वतःभोवतीची एक फेरी २३ तास, ५६ मिनिटे आणि ४.०९९ सेकंदात पूर्ण करते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi पृथ्वीवरील हा सर्व जमिनीचा थर शिलावरणाचा भाग आहे. आपल्या पृथ्वीचा बराचसा भाग पाण्याने व्यापला आहे. या पाण्याखालीही शिलावरण असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi