प्रश्नांची यादी

आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? open

ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, प्रार्थना, विनंती, उपदेश, आशीर्वाद व सूचना या गोष्टींचा बोध होतो, त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात.

पूर्ण वाचा →

माकडाचा खेळ करणारा कोण? open

माकडाचे खेळ दाखवून मनोरंजन करीत उदरनिर्वाह करणारा समाज. गावाची यात्रा, गावातील हमरस्‍ता,चौक,शाळा,बाजार यांसारख्‍या सार्वजनिक ठिकाणी माणसाळवलेल्‍या माकडांचे खेळ दाखविणारा हा समाज संपूर्ण भारतात आढळतो. मदारी असेही प्रचलीत नाव त्‍यास आहे.

पूर्ण वाचा →

समाजाची सेवा करणारा कोण? open

समाजसेवक समाजातील मागासलेल्या लोकांसाठी आणि गोर गरीबांच्या हक्कासाठी व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढतो. तो समाजाच्या हितासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी काम करत असतो.

पूर्ण वाचा →

प्रतिमा या शब्दाचा अर्थ काय होतो? open

मानसशास्त्राच्या दृष्टीने दृश्य वस्तूमुळे घडणाऱ्या वेदनांच्या उद्दीपनाशिवाय केवळ कल्पनाशक्तीमुळे त्या त्या वस्तूची प्रतिकृती किंवा प्रतिबिंब जेव्हा मनात साकार होते, त्या प्रतिबिंबास प्रतिमा म्हणतात.

पूर्ण वाचा →

ज्या नामाने एका गटाचा किंवा समूहाचा बोध होतो त्याला काय म्हणतात? open

समूह वाचक: ज्या नामाच्या योगाने समूहाचा बोध होतो त्यास समूह वाचक नाम म्हणतात. उदा: मोळी, जुडी, ढिगार, कळप, टोळी इत्यादी.

पूर्ण वाचा →

मराठीतील पहिले व्याकरणकार कोण? open

मराठी भाषेतील पहिले व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर हे आहेत. मराठी भाषेतील पहिले मुद्रित व्याकरण महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे आहे. हे गंगाधर शास्त्री फडके यांनी लिहिलेले आहे

पूर्ण वाचा →