नवीन प्रश्न

मंत्रिमंडळाची रचना काय आहे? open

भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री , राज्यमंत्री आणि राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) यांचा समावेश होतो. या केंद्रीय मंत्रिमंडळाचे नेतृत्व भारताचे पंतप्रधान करतात.. केंद्रीय मंत्रिमंडळ नावाची कार्यकारी संस्था ही भारतातील सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रात किती मंत्रालये आहेत? open

महाराष्ट्राच्या विधानसभेत २८८ आमदार आहेत. म्हणजेच २८८ च्या १५ % संख्या ४३, मग मंत्रीमंडळात जास्तीत जास्त ४३ मंत्री होऊ शकतात. त्यातले किती कॅबिनेट मंत्री व किती राज्यमंत्री करायचे हे मुख्यमंत्र्यांच्या हाती असते.

पूर्ण वाचा →

मंत्रिमंडळातील सदस्य कोण आहेत? open

केंद्रीय मंत्रिमंडळ नावाची कार्यकारी संस्था ही भारतातील सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे. कलम ७५ नुसार केवळ पंतप्रधान आणि कॅबिनेट मंत्री दर्जाचे मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत.

पूर्ण वाचा →

कॅबिनेट मंत्री कोणाला म्हणतात? open

मंत्री मंडळाला इंग्लिश मध्ये कॅबिनेट म्हणतात. ह्या मंत्रीमंडळात जो सहभागी असतो तो मंत्री होय. मंत्री मंडळातील मंत्री हा त्याला मिळालेल्या विभागाचा प्रमुख असतो आणि ह्या खात्यांशी संबंधित निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार त्याच्याकडे असतो. त्याच्या हाताखाली राज्यमंत्री, उपमंत्री असू शकतात.

पूर्ण वाचा →

मुख्यमंत्र्यांचा कालावधी किती असतो? open

मुख्यमंत्री पदासाठी कोणत्याही मुदतीच्या मर्यादा नाहीत, जोपर्यंत विधानसभेत बहुमत आहे तो पर्यंत ती व्यक्ती मुख्यमंत्री पदावर राहू शकते. विधानसभेचा कालावधी हा पाच वर्षाचा असतो.

पूर्ण वाचा →

राज्यात किती मंत्री असतात? open

मंत्रीमंडळातील मुख्यमंत्र्या सहित एकूण मंत्र्यांची संख्या विधानसभेतील एकूण सदस्यांच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही अशी तरतूद आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत २८८ आमदार आहेत. म्हणजेच २८८ च्या १५ % संख्या ४३, मग मंत्रीमंडळात जास्तीत जास्त ४३ मंत्री होऊ शकतात.

पूर्ण वाचा →

मंत्रिमंडळात किती मंत्र्यांची नियुक्ती करता येईल? open

भारतीय संविधानाच्या मते, मंत्रीमंडळात लोकसभा सदस्यांच्या एकूण संख्येच्या १५% पेक्षा अधिक मंत्री संख्या नसावी. मंत्री हे संसदेच्या एका सभागृहाचे सदस्य असले पाहिजेत. कोणताही मंत्री जो सलग सहा महिने संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तर त्याचे मंत्रीपद आपोआप काढून घेतले जाते.

पूर्ण वाचा →

एका राज्यात किती कॅबिनेट मंत्री असू शकतात? open

मंत्रीमंडळातील मुख्यमंत्र्या सहित एकूण मंत्र्यांची संख्या विधानसभेतील एकूण सदस्यांच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही अशी तरतूद आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत २८८ आमदार आहेत. म्हणजेच २८८ च्या १५ % संख्या ४३, मग मंत्रीमंडळात जास्तीत जास्त ४३ मंत्री होऊ शकतात.

पूर्ण वाचा →